Saturday 26 January 2019

शुर जवानांची ही भूमी

शुर जवानांची ही भूमी 
मलीन तिजला करु नका,
गुण तयांचे अंगीकारा
पोकळ त्यांना भजू नका...

देव मानूनी देशाला 
जनसेवेचे व्रत धरा,
गल्ली-गल्लीतुन देशभक्तिची
वांज गीते गाऊ नका....

तारुण्य हे वरदान असे
त्यास जपा निष्ठेने,
मुलींच्या मागे उगा फिरूनी
होळी त्याची करु नका.....

आई - बहीण रूप स्त्रीचे
असते लोभसवाणे,
कधी अचानक बनेल काली
इतके तिजला छळु नका....

अपूर्ण आहात स्त्रिशिवाय
सत्य एक हे मनी धरा,
कमी लेख़ूनी, कटु वाणीने
तिची अवहेलना करु नका....

स्तुति सुमनांची फुले उधळा 
सौन्दर्याच्या चरणी, पण
गुलाम होऊनी स्त्री सौख्याचे
लाळघोटेपणा करु नका....

पति-पत्नी दोन चाके
संसाररूपी गाडीची,
थोरपणाच्या लालसेपोटी
तिचे अस्तित्व गिळु नका...!!!

2 comments:

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...