Monday 15 October 2018

एकटी मी


एकटी मी
एकटी मी माझी व्यथा
सांगू तरी कुणाला
बहिऱ्या  झाल्या दशदिशा
साद घालु कशी तुला...

जिकडे तिकडे वावरतात
शरिरे माणसांची
शोधुनही ना मिळे
ओल कुठेच माणूसकीची...

नाव आहे माणूस
परी अर्थ ना त्या शब्दाला
माणूस म्हणवून घेतात सारे
दिशाहीन जगण्याला...

माणूस झाला इतका स्वार्थी
जान ना उरली माणूसकीची
स्वतःपुरता जगतो आहे
पर्वा ना त्याला कुणाची.....…!!

3 comments:

S.v. killedar. said...

क्षणभर मनाला विचार करण्यास भाग पाडणारी सुंदर
रचना...👌

S.v. killedar. said...

Heart touching lines!

Unknown said...

खूप खूप छान

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...