Marathi kavita

गोड गोजिरं बालपण
गोड गोजिरं एक बालपण....
पावसाच्या सरीनी भिजलेलं...
स्वप्न ठेऊन होडिमधे....
त्याच्यापाठी वाहणारे.....
त्याला काळजी फक्त त्या होडीची,
चिंता फक्त पावसाची......
या क्षणात जे जवळ आहे....
ते जपायची.....
उद्याची चिंता तर मोठ्याना,
ती नाही जाण या तान्हूल्यांना ...
त्यांच जग आज आणि आज एवढंच....
मोठी जगतात.....काल आणि उद्याच्या वनव्यात
आज ची राख उधळत.....!!!!











●●●●●●●●●●●●●●

हे वेड वेड बालपण
हे वेड-वेड बालपण....
उनाड खटयाळ  मन
बागडायला असतं..
सभोवती पसरलेल अंगण....!

ना चिंता असते उद्याची,
ना पर्वा गेल्या क्षणांची...
आपल्याच विश्वात,
असतं बेफिक्र बागडत...
हे वेड-वेड बालपण.......!!!

आईच्या कुशीत विसावणार,
बाबांच्या कथेत रमनार....
चिउ काऊच्या संगे धावनार,
झुळसुळ वाऱ्याशी बोलणार,
असं असतं हे बालमन....
हे वेड-वेड बालपण....!!!

भेटेल का परत एकदा....
बालपणीचा काळ सुखाचा
त्या कागडाच्या होडया
त्या चिंचा, लगोऱ्या.....
त्या रंगीत गोटया....
हव आहे परत....हरवलेलं बालपण
हे वेड- वेड बालपण.....!!!








●●●●●●●●●●

मन माझही धावलं तुझ्या पाठी
आज जाताना.....
तुला....
नाही अडवलं मी....
बस्स,
तुझ्यासोबत मन माझही धावलं....
तुझ्या पाठी-पाठी
आणि,
नेहमीसारखचं.....
तुला हे ही नाही कळलं....
बस,तुझ्या पाठी तेहि चालत राहिलं....
पाहायक होतं रे.....
माझी स्वप्न पूर्ण करायला ...
सूर्य माझा..
किती आणि कसा जळतोय ते...
तू तर कधीच नाही सांगत....
तुझ्या व्यथा....
मौनात लपलेल्या तुझ्या मनाला,
उलघड़ावं लागतं...अलगद
तुझ्याही नकळत.....
मनात तुझ्या,उतरावं लागतं....
तुझ्याही नकळत...
अलघडावी लागतात.....
एक एक दारं....
मनातील तुझ्या......
तुझ्याही नकळत....
किती रे वेगळ....
बंधन आपलं.....
कळत-नकळत.....
अवती भवती..... अकमेकांच्या
तुझ्या पाठी आलेलं .....मन माझं
असच....
माझ्या स्वप्नांच्या भिंति.....
उभारताना.....
ओघळलेले ......
तुझ्या घामाचे ते थेंब
मला जपायचे आहेत....
तुझ्या नकळत.....
साठवायचे आहेत.....
मला....
ओंजळीत माझ्या....
तुझ्या नकळत.....










●●●●●●●●●●●●●●●


तुझ्याही नकळत तुला अडवते
आज सकाळी.....
तू जाताना......
खुप वाटत होतं..... तुला थांबवावं....
आज सुट्टी घे म्हणावं....
पण नाही..... काहीच बोलले नाही....
आणी,
मी न बोलता,तुलाही ते समजलं नाही.
बस्स.... तू पाहीलंस..... दोन क्षण,
आणि निघुन गेलास.
मी पाहतच राहिले.....
एकटक....तुझ्याकडे
तू नजरेआड होईपर्यंत.....
मी अडवलं तुला.....
मनात माझ्या.....
तुही थांबलास....मनात माझ्या
काही क्षण घुटमळलास....मनात माझ्या
विसावलास मनात माझ्या....
तू गेल्यावर ......तू येईपर्यंत
दवळत असतो....माझ्या अवती भवती....
तूझ्या मंद मंद ......गंद
दिवसभर मला सोबत करत असतात.....
घरातील तुझ्या पाऊलखुणा.....
बोलतात माझ्याशी...तुझ्या मौनातील वेडे शब्द....
पाहत राहते मला..... माझ्या चेहऱ्यावर खिळलेली तुझी नजर
तू असतोस....माझ्या सोबत....
माझ्यात भरून....












●●●●●●●●●●●●●●


शुर जवानांची ही भूमी
शुर जवानांची ही भूमी 
मलीन तिजला करु नका,.
गुण तयांचे अंगीकारा
पोकळ त्यांना भजू नका...

देव मानूनी देशाला 

जनसेवेचे व्रत धरा,
गल्ली-गल्लीतुन देशभक्तिची
वांज गीते गाऊ नका....

तारुण्य हे वरदान असे

त्यास जपा निष्ठेने,
मुलींच्या मागे उगा फिरूनी
होळी त्याची करु नका.....

आई - बहीण रूप स्त्रीचे

असते लोभसवाणे,
कधी अचानक बनेल काली
इतके तिजला छळु नका....

अपूर्ण आहात स्त्रिशिवाय

सत्य एक हे मनी धरा,
कमी लेख़ूनी, कटु वाणीने
तिची अवहेलना करु नका....

स्तुति सुमनांची फुले उधळा 

सौन्दर्याच्या चरणी, पण
गुलाम होऊनी स्त्री सौख्याचे
लाळघोटेपणा करु नका....

पति-पत्नी दोन चाके

संसाररूपी गाडीची,
थोरपणाच्या लालसेपोटी
तिचे अस्तित्व गिळु नका...!!!


●●●●●●●●●●●●●●●●●

तुझ्या अंगणातील आभाळ 
थोड्स आभाळ, तुझ्या अंगणातील..…..
तुझं आणि माझं......
आपलं.....

चमचमनारे तारे,मंद-धुंद वारे
कधी पुनवेचा उमंग
कधी अमावसेचा संग
दोन्ही तुझ्यासवे..... असेच पहावे
कधि काळोखात विसावलेलं
दूधी चांदण्यात कधी न्हालेलं....
तुझ्या अंगणातील आभाळ.......
तुझं आणि माझं....
आपलं....

तप्त उन्हाच्या झळा....कधी कोवळ्या किरणांचा लळा
उगवत्या सूर्याचा खेळ
कधी मावळतिशी मेळ
सार तू झेललं
सार तू सोसलं
मला आपल्या सावलीत जपलं
कधी हट्ट वेडा
कधी श्वास मोकळा
आठवनिंचा कवडसा जणू रंगलेला
साऱ्या आठवनीं जपुन
तुला न् मला घेऊन
अजूनही हसत आहे
तुझ्या अंगनातील आभाळ
तुझं आणि माझं.....
आपलं......

पावसाच्या सरिनी, जातं जेव्हा न्हाऊनि
एकरूप होते माती...मातीमधे मिसळुनी
कधी स्पर्श ओल्या सरिंचा
कधी भास गर्जनेचा
मेघात डाटलेल्या त्या आर्त भावनाचा
आल्या सरी....गेल्या सरी
आपल्यासाठी बाकी तरी
तुझ्या अंगणातील आभाळ
तुझं आणि माझं.....
आपलं......

●●●●●●●●●●●

वडील.....
आठवतात ते दिवस... .
जेव्हा,
सावली बनून तुम्ही सोबत होता....
डोक्यावर आभाळ नव्हतं,तुमचा हात होता.....
तुमचं सुख माझ्या सुखात असायच.....
दुःख माझ तुमच्या डोळ्यातून वाहायच.….
बोट पकडून चालायला तर शिकवल.....
चालता आल्यावरही हात पकडूनच सगळीकडे नेल.....
मी जेवले ते माहित असायच.....
तरीही,आपण जेवायच्या आधी,तू जेवलीस ना म्हणून विचारायच.....
हसायची तर नेहमीच,का हसतेस म्हणून कधी नाही विचारायच....
गप्प जरा दिसले की लगेच,कोण काय बोलल तुला ? म्हणून आईकडे पहायच....
किती आठवणी त्या डोळ्यासमोर तरळतात
थेंब आसवांचे नकळत ओघळतात
काय होतात माझ्यासाठी ते सांगायचंच राहून गेल
शब्द येण्याआधी ओठांवर, विश्व माझ उधळुन गेल....
कळ उठते काळजात तो क्षण आठवला की
हुरहुर लावून गेल, ते तुमचं जाण अकाली
डोळे भरून पहा.... शेवटचे.... सांगत होती सारीजण
शेवटचे....?
शेवटचे....??
मनात घुमत होता हा एकच प्रश्न
ओल्याचिंब डोळ्यांनी पाहिला तो सोहळा
ती आंघोळ...ती आरती....कपाळावरील तो टिळा
पाहून हे सार.... कस सांगू....किती न कशी तुटले
आक्रोश किती-किती ऱ्हदयामधुन उठले
दूर तुमची चिता ....न माझ्यात मी
अकाचवेळी जळत होती
कितीतरी वेळ....
चिता शांत ही झाली
पण मी अजूनही जळतच आहे...
तुमच्या आठवणीत
रोज,थोड़ी थोड़ी....
तुम्ही गेलात...दूर
पण ऐका.....
मी रोज बोलावतेय तुम्हाला.....
आवाज देतेय, दाही दिशांना....
याव लागेल तुम्हाला....
किमान माझ्या स्वप्नात तरी.....
आणि येऊन..
परत एकदा थोड़ चालाय शिकवा.....
तुमच्याशिवाय कस जगायच तेहि शिकवा.....
दया आवाज परत एकवेळ....रानी रे......!!!

●●●●●●●●●●●


माझ्या मनातील
एक सागर तुझ्या डोळ्यातील, मला त्यात उतरु दे.....
गुन्हेगार आहे मी, मला बुडून मरु दे....!!!

Ak sagar tuzya dolyatil,mla tyat utru de...
Gunhegar aahe mi,mla budun mru de.....!!!

रवी आभाळी रेंगाळत आहे,त्याला डोंगराच्या कुशित शिरू दे....
मी पण जाईन माघारी,मला पूर्ण हारू तर दे....!!!

Rvi aabhali rengalt aahe,tyala dongrachya kushit shiru tr de....
Mi pn jain maghari,mla purn haru tr de....!!!

तुझ्या ऱ्हदयातील सागरात मला शोध,जर तिथे मी नसेन तर कुठेच मी नसेन....!!!

Tuzya rudyatil sagrat mla shodh,jr tithe mi nsen tr kuthech mi nsen.....!!!

तुझीच तर देण, कि मी जगायला शिकले....
तक्रार न करता, मनीचे घाव शिवायला शिकले.....!!!

Tuzich tr den ,ki mi jgayla shikle.....
Takrar n krta,mniche ghav shivayla shikle.....!!!


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



नकळत
माझ्याही नकळत......कुठे कुठे मी रमते ....
ना कुठे थांबते....बस... मनातून धावते....
कधी पावसाच्या सरित ओलिचिम्ब भिजते.....
कधी फुलाच्या गंधात दरवळून निघते......
कधी निळ्या आभाळी चांदन्यांशी खेलते....
कधी दूर रानात वाऱ्यासोबत धावते......
सुख दुःख यात नाही अडकायच......
हसुन या दोन्हीना पार करते
 ऊन सावली.....अशीच....अलगद झेलते...
तरीही नकळत इथे वा तिथे उरते....!!!


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



अंधार
अंधार आवडतो आता
खुप आवडतो
रात्रीचा .....काळाकुट्ट
सगळीकडे पसरलेली शांतता ....
न तो अंधार
आवडतो…...
जो लपवतो फ़सवे दिखावे
खोटे मायाजाल

टुटलेल्या स्वप्नांची .... भंगलेल्या मनाची
अजूनही साथ आहे......
बाकी तर काही नाही.....
शून्यात पाहणाऱ्या नजरेला .....थकलेल्या पापण्यांना
उधार ध्याव लागनाऱ्या झाेपेची साथ आहे...
शांत झोपवणाऱ्या गोळ्यांचा संग...
आवडतो.....

कधी घाबरायची या अंधाराला.....
डोळे मिटून.....श्वास रोखुन...
थरथरनाऱ्या जीवाला....
माहित होत..….
तू आहेस…..तुझी साथ आहे....
आत्ता.... तुझ्या नसण्याने.....
भानही नाही.....
आंधारचे....ना भीतिचे.....
प्रकाश....तु नसल्याची जाणीव करून देतो......
अंधार......तू येशील म्हणून सांगतो...
 मला समजवणारा....हा अंधार....
आवडतो.....

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦


चालले मी
जे न घरटे माझे राहिले
त्यास सोडूनि चालले मी
खोटी , फ़सवी सारी नाती
आज तोडूनी चालले मी....

घड़ीभराची रंगीत स्वप्ने
पाहत होती वेडी नयने
जाग येता निद्रेला
शोधन्यास ती चालले मी....

कळ्यापरी त्या कोमल भावना
व्यापुन होत्या खोल मना
कटु वाणीने ज्या करपल्या
फुलवण्यास त्या चालले मी.....

माझे-माझे वाटत होते
मन ज्याभोवती गुंतुन होते
जाणीव होता परकेपनाची
बंध तोड़ूनी चालले मी.....

ऋतु जसा येतो अन् जातो
माणस ही तसा रंग बदलतो
कळून आले ज्याक्षणी हे
रंग बदलुनी चालले मी....!!!


♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

एकटी मी
एकटी मी माझी व्यथा
सांगू तरी कुणाला
बहिऱ्या  झाल्या दशदिशा
साद घालु कशी तुला...

जिकडे तिकडे वावरतात
शरिरे माणसांची
शोधुनही ना मिळे
ओल कुठेच मानुसकीची...

नाव आहे माणूस
परी अर्थ ना त्या शब्दाला
माणूस म्हणवून घेतात सारे
दिशाहीन जगण्याला....

माणूस झाला इतका स्वार्थी
जान ना उरली मानुसकीची
स्वतःपुरता जगतो आहे
पर्वा ना त्याला कुणाची.....…!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


 माझ्या डोळ्यांना 
तुझेच रूप भावले
मनही झाले वेडे
तुझ्याकडेच धावले....

Maiya dolyana
Tuzhech rup bhavle
Manhi jhale vede
Tujyakadech dhavle

चांदण्या रात्रि
 तुझा हात हाती
नयन माझे पाहती 
तुझी अबोल प्रिति

Chandnya ratri
Tuza hat hati
Nyn maze pahari
Tuzi abol priti

एकांताच्या क्षणी
वारा स्पर्शून जातो
जाता जाता हळूच
तूझ्या नावाने छेडतो

Akantachya kshani
Vara sprshun jato
Jata jata khuch
Tuzya navane chedto


माझ्या डोळ्यात अनेकदा
तुझे रूप विसावले
पण माझ्या मनीचे भाव
तुला कधीच नाही कळले

Mazya dolyat anekda
Tuze rup visavle
Pn mazya mniche bhav
Tula kadhich nahi klle

आकाशीचा चंद्र सख्या तू
 चांदणी मी तर तुझी
सात जन्मांची सोबत सुंदर
आहे तुझी न माझी

Aakashicha chandr skhya tu
Chandni mi tr tuzi
Sat jnmanchi sobt sundr
Aahe tuzi n mazi

खेळ झाला नजरेचा
अगदी योगायोगच
पण उगम झाला प्रेमाचा
ना शब्दांची गरज भासली
नाही वचनांची सोबत
फक्त एक बन्ध ओढीचा
मनामधे फुलविनारा
वसंत प्रेमाचा

Khel zala njrecha
Agdi yogayogch
Pn ugm zala premacha
Na shabdanchi grj bhasli
Nahi vchnanchi sobt
Fkt ak bnd odhicha
Mnamdhe fulvinara
Vsnt premacha

तुझ्या एका हाकेसाठी
किती पाहावी वाट
माझी अधीरता मोठी
तुझे मौनही अफाट

Tuzya aka hakesathi
Kiti pahavi vat
Mazi adhirta mothi
Tuze mounhi afat

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


ऋतु घेऊनी आला
भ्रमर सांगते हळू फुलाला
प्रितिला रंग आज घेऊनी आला
ऋतु घेऊनी आला......

सांग कुणा भेटाया ही नदी चालली
कुण्या साजनाची मनी प्रीत जागली
ओढ़ कशाची तिच्या जीवा लागली
ओढ़ मिलनाची तीला लावुनी गेला....
ऋतु लावूनी गेल....

सांग ही हवा का आज अशी धावते
गुपित कोणते ही साऱ्याना सांगते
ऐकून बोल कळी-कळी लाजते
लाजेला साज नवा देवूनी गेला.....
ऋतु देवूनी गेला....…!!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

संपून काळ गेला
नवा अर्थ आयुष्याचा सांगून काळ गेला....
व्यवहार या जगाचा शिकवून काळ गेला...

नाही कसे म्हणू मी सांगितले न काही....
डोळ्यात भाव वेडे वाचून काळ गेला....

रात्रीत चांदण्यांच्या मैफिली कितिक रंगल्या....
स्मृति मनी त्या साऱ्या ठेऊन काळ गेला....

भोळी, अजान मी तर , माझ्यात दंग होते....
देऊन भूल मजला डिवचून काळ गेला....

आघात किती सोशिले दुष्काळी जीवनाचे
आभाळ भरून येता संपून काळ गेला....…!!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


 धोखा
 तूझ्या मुक्या शब्दांना
समजत होते
सन्मान माझा...
पण त्याच अबोल
शब्दांनी केला
अपमान माझा...

तुझ्या डोळ्यातील
खोल भावनांना
समजत होते
अलंकार माझा....
पण त्याच खोल
भावनांनी केला
संहार माझा......

तुझ्या वागण्यातील साधेपना
वाटत होता
अनोखा मला....
पण त्याच साधेपणाने
दिला धोखा मला....

तुझ्या माझ्या प्रेमाची
बांधली होती मी पूजा
पण त्याच प्रेमाने
दिली मला सजा.....…!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

तुझ्या वाटेवर
हळूच येतोस .....न निघुन जातोस....
कधी येतोस .....कधी जातोस.....
क्षणात इथे तर क्षणात कुठे ?
तुझ्याशी जणु पाठशिवनिचा खेळ खेळत असते....
मी बस तूझ्या वाटेवर....
स्वतःला पांघरुन.....तुझी वाट पाहत असते.......

अंगणातील चाफा.... मंद मंद दवळत असतो....
हवेतील गारवा.....उगीचच शहारत असतो.....
तुझ्या उंबऱ्यावर ....थांबलेली रात्र
हलकेच डोळे मिटून,
तुझ्या आठवणीत दाटुन,
हळू हळू पहाटेच्या रथाकडे चाललेली असते....
तिला अडवत असते......
तुझ्या वाटेवर तिला मी आळवत असते......

तुळशी जवळचा दिवा.....त्यातील ती ज्योत....
वा-याने जेव्हा हालत असते....
एक सावली.….. घोट घोट करून मला पित असते....
क्षणभर घाबरून,
डोळे मिटून,
तशीच, तिथेच मी थांबलेली असते........
तुझ्या वाटेवर मी मलाच सावरत असते.....

ती पानांची सळसळ..…...
काजव्यांची चमचम....
किर्र अंधरातली ती अबोल चंद्रवेल.....
दुरुनच येणारी ती तुझ्या पावलांची चाहूल.....
थोड़ी थोड़ी
माझ्याकडे येणारी तुझी सावली.....
त्या सावलीत हरवत असते....
तुझ्या वाटेवर.... तूझ्यात हरवत असते…...

आता न बाकी उरावे .....
तुझ्या माझ्यातले दुरावे....
तू....तू न रहावे....
मी..... मी न रहावे....
तुझ्यात उतरून
बस तू.... तूच बनून जावे...….
तुझ्या वाटेवर ....तुझ्या न् माझ्या प्रमाचे चांदणे फुलावे.....….
तुझ्या वाटेवर.......!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

अंस झालं तर
असं झालं तर,
कधितरी..........
विरहाचे दुरवर पसरलेले किनारे असतील....
आभाळी पौर्णिमेचा चंद्र न् त्याचे इशारे असतील....
आणि समोर तू.....
कधितरी अचानक
असं झालं तर.......

सुन्या सुन्या रात्रि, ढगांच्या आड़ लपलेला चंद्र असेल.....
चांदन्यांच्या मैफिलित, वाऱ्यासोबत झुलनारा, मोगऱ्याचा गंध असेल....
तुझ नाव ओठांवर असेल...
न् समोर तू....
कधितरी अचानक
असं झालं तर.....

सकाळची रम्य पहाट असेल.....
वाऱ्याची मऊ मखमली
शहारे आणणारी साथ असेल.....
डोंगराच्या माथ्यावर सजलेला.....लाल लाल.... सूर्याचा टिळा असेल.....
त्या लालेलाल बिंबात तुला पाहत....
डोळे घट्ट मिटून घ्यावेत....
तुला तसेच डोळ्यात साठवून, हलकेच डोळे उघडावेत
न् समोर तू....
कधितरी अचानक
असं झालं तर.....

शांत शांत संध्या असावी....
आसपास कुणीही नसाव.....
मी एकटी.....अशीच
मन तुझ्या आठवणीत हरवलेलं असावं....
आणि तू यावस्.....
कधितरी ....
असं झालं तर......

हे ढग, बेधुंद व्हावेत,
रिमझीम सरींणी धावत येऊन....धर्तीला घट्ट बिलगावं....
माझ्यासारखं तुझही मन,
मला भेटाय आतुर व्हावं...
तू यावास....मला भेटाय....
कधितरी .....
असं झालं तर.....

एकांत असावा....पहिलाच पाऊस.....
पानांवरुन टिपटिपणारे पावसाचे थेंब.....
ओली थंड हवा...इंद्रधनुचा झुला......
नीळी सावळी.... आभाळाची सावली......
न् तू माझ्यासोबत
कधितरी ......
असही झालं तर.....

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

नाती जुळुन् आली
नाती जुळुन आली
नाजुक बन्धनाची,
झाली खुली कवाड़े
बन्द ऱ्हदयाची....

झाली फुले असंख्य
माझ्या भावनांची,
खुलवी मनास माझ्या
ही जाण सुवासाची...

निस्तेज होत्या ज्या
मनात भावना
छेडूनी कोण गेलं ?
ही तार भावनांची.....

आले हळूच कोण?
डोळयांच्या वाटेने,
ऱ्हदयाच्या गावी
सत्ता तयाची......!!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

काय करशील
गुलाब जेव्हा सुखेल, तेव्हा काय करशील ?
गंध ही न् उरेल, तेव्हा काय करशील ?

शब्द सारे मुके माझे, मुकेच त्यांना राहु दे
ओठांवर जर आले चुकुन ,तर तेव्हा काय करशील ?

खुप मजा वाटते ना, रूसताना....मनवताना
पण जिव्हारी जर टोचल काही,तर तेव्हा काय करशील ?

हे प्रेम,ही वचनं, चार डोळ्यांच्या भेटी तमाम
साथ जर सुटली मधेच, तर तेव्हा काय करशील ?

खुप वाटत काजळाच्या जागी तुलाच सजवावे डोळ्यांत
पण आला कधी पाऊस, तर तेव्हा काय करशील ...?


●●●●●●●●●●●●


माणुस
किती रूपं माणसाची
किती बोलतो हा भाषा
त्याच्या माणूसपणाची
केली त्याने दुर्दशा

असा कसा रे माणसा
तू बदलतो रंग
तुझी किमया पाहुनी
झाला दानवही दंग

नको बाळगू तू वेडया
खोटी अवास्तव हाव
तुला झेपेल अशाच
वाटेवरूनी तू धाव

असता तुझे तुझ्यापाशी
का तू असा वाऱ्यावरी ?
तुझे आयुष्य असे का
झाले उदास,लाचारी

किती करतोस चाळे
किती करशील भोंदुपणा
तुला जमतो कसा रे
जणामधे साधुपणा

जे नाही तुझ्या श्रमाचे
त्याची का तुला अभिलाषा
दुसऱ्याच्या धनावरची
दे सोडूनि तू आशा

एकेकाळचा राम तू
तूच आहेस शिवबा
शोध जरा अंतरी तू
तुझ्या कर्तुत्वाची शोभा

No comments:

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...