Friday 19 October 2018

तुझ्या वाटेवर......


हळूच येतोस .....न निघुन जातोस....
कधी येतोस .....कधी जातोस.....
क्षणात इथे तर क्षणात कुठे ?
तुझ्याशी जणु पाठशिवनिचा खेल खेलत असते....
मी बस तूझ्या वाटेवर....
स्वतःला पांघरुन.....तुझी वाट पाहत असते.......

अंगणातील चाफा.... मंद मंद दवळत असतो....
हवेतील गारवा.....उगीचच शहारत असतो.....
तुझ्या उंबऱ्यावर ....थांबलेली रात्र
हलकेच डोळे मिटून,
तुझ्या आठवणीत दाटुन,
हळू हळू पहाटेच्या रथाकडे चाललेली असते....
तिला अडवत असते......
तुझ्या वाटेवर तिला मी आळवत असते......

तुळशी जवळचा दिवा.....त्यातील ती ज्योत....
वा-याने जेव्हा हालत असते....
एक सावली.….. घोट घोट करून मला पित असते....
क्षणभर घाबरून,
डोळे मिटून,
तशीच, तिथेच मी थांबलेली असते........
तुझ्या वाटेवर मी मलाच सावरत असते.....

ती पानांची सळसळ..…...
काजव्यांची चमचम....
किर्र अंधरातली ती अबोल चंद्रवेल.....
दुरुनच येणारी ती तुझ्या पावलांची चाहूल.....
थोड़ी थोड़ी
माझ्याकडे येणारी तुझी सावली.....
त्या सावलीत हरवत असते....
तुझ्या वाटेवर.... तूझ्यात हरवत असते…...

आता न बाकी उरावे .....
तुझ्या माझ्यातले दुरावे....
तू....तू न रहावे....
मी..... मी न रहावे....
तुझ्यात उतरून
बस तू.... तूच बनून जावे...….
तुझ्या वाटेवर ....तुझ्या न् माझ्या प्रमाचे चांदणे फुलावे.....….
तुझ्या वाटेवर.......!!!

No comments:

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...