Friday 7 December 2018

तुझ्या अंगणातील आभाळ.....

थोड्स आभाळ, तुझ्या अंगणातील..…..
तुझं आणि माझं......
आपलं.....

चमचमनारे तारे,मंद-धुंद वारे
कधी पुनवेचा उमंग
कधी अमावसेचा संग
दोन्ही तुझ्यासवे..... असेच पहावे
कधि काळोखात विसावलेलं
दूधी चांदण्यात कधी न्हालेलं....
तुझ्या अंगणातील आभाळ.......
तुझं आणि माझं....
आपलं....

तप्त उन्हाच्या झळा....कधी कोवळ्या किरणांचा लळा
उगवत्या सूर्याचा खेळ
कधी मावळतिशी मेळ
सार तू झेललं
सार तू सोसलं
मला आपल्या सावलीत जपलं
कधी हट्ट वेडा
कधी श्वास मोकळा
आठवनिंचा कवडसा जणू रंगलेला
साऱ्या आठवनीं जपुन
तुला न् मला घेऊन
अजूनही हसत आहे
तुझ्या अंगनातील आभाळ
तुझं आणि माझं.....
आपलं......

पावसाच्या सरिनी, जातं जेव्हा न्हाऊनि
एकरूप होते माती...मातीमधे मिसळुनी
कधी स्पर्श ओल्या सरिंचा
कधी भास गर्जनेचा
मेघात डाटलेल्या त्या आर्त भावनाचा
आल्या सरी....गेल्या सरी
आपल्यासाठी बाकी तरी
तुझ्या अंगणातील आभाळ
तुझं आणि माझं.....
आपलं......

5 comments:

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...