Saturday 15 December 2018

तुला पाहिले....नव्याने

Hello friends......
 मैं अपने blog पर एक नया page add कर रही हूँ।
जिसका नाम है.....
किस्से कहानियाँ।
मेरे बाकी page आपको पसंद आए उसी तरह ये भी आपको पसंद आएगा ऐसी मैं आशा करती हूँ।
वैसे तो ये page मैं हिंदी में ही लिखनेवाली हूँ, लेकिन ये किस्सा कुछ ऐसा है जो मैं अपनी भाषा में लिखना चाहूँगी।जो मैंने महसूस किया वो हर अहसास बहोतही खास है।यही बात है कि मैं अपनी ये पहली post मराठी में लिखनेवाली हूँ। अगर आप post को हिंदी में पढ़ना चाहते हो तो आप हमने दिए गए translater के जरिए हिंदी में पढ़ सकते हो....
धन्यवाद.......!!!

तुला पाहिले.....नव्याने


रविवारची सकाळ......
सुट्टीचा दिवस.....
सुट्टी म्हनलं की सगळच निवांत.उशिरा उठायच,आरामात उरकायच,वेळेचं बंधन नसतं नेहमीसारख. पण आज बाहेर जायचं होतं. तस ठरलही होतं. मी 8 ला उठले ,उरकल.किल्लेदार झोपले होते.एक तर सुट्टी असते ,थोड़ अजुन झोपू देत म्हणून मी त्यांना नाही उठवलं. माझ उरकल आणि मी न्यूज पेपर आणण्यासाठी बाहेर गेले. झोप बिघडेल म्हणून त्यांना न सांगताच गेले. न्यूज पेपर घेतला आणि घरी येत होते तर वाटेत काकी भेटल्या त्यांच्याशी बोलण्यात थोड़ा वेळ गेला.
घरी आले तर किल्लेदार उठले होते.....
मला पाहून खुप चिडले.
खुप म्हणजे..... थोड़े !
हो....
त्यांना माझ्यावर चिडता नाही येत. प्रेम करतात ना खुप सार, म्हणून असेल कदाचित.मी कधीच त्यांना माझ्यावर चिडलेलं , नाराज झालेलं पाहिलं नाही.
आजही माझी चूक होती.मला माहितही होतं आणि मान्यही . मी काहीच बोलले नाही. ते थोड़ चिडलेत आणि मग शांत झालेत. अस होतं कधी कधी.पण आजचा किस्सा जरा वेगळा होता. एरव्ही लगेच लडायला लागणारी मी आज चक्क रडायला लागले होते.बाहेर जायचं आहे ते माहित असूनही मी न सांगतच न्यूज पेपर आणण्यासाठी बाहेर गेले,घरी परत यायला उशीर केला.चूक तर होती माझी.पण मला वाईट वाटेल म्हणून ते मनापासून रागवले ही नाहीत माझ्यावर.एवढा विचार करतात ते माझा.आणि तेच पाहून मला रडू आलं.
नंतर ते आपल्या कामाला लागलेत. ते उरकत होते आणि मी बस्स त्यांना पाहत होते.जस की मी पहिल्यांदाच पाहतेय त्यांना. माझे डोळे भरून आले होते.त्यांना वाटलं की मी ते ओरडलेत म्हणून उदास आहे,पण तस नव्हतं. ते चिडले जरी असले तरी त्यांच्या मनातील काळजी मला दिसत होती.ते पाहुनच मला गहिवरून आल होतं. ते एवढी काळजी का करतात ? हा एकच प्रश्न डोक्यात घुमत होता. लहान तर नाही मी की चुकले असते मग तरी का?
खर तर त्यांनी अजुन रागवायला हव होतं पण ते थोड़ चिडले आणि आपलं उरकाय लागलेत.मी पण माझ्या तयारीला लागले.माझ मन ठीक नव्हतं.बस एकच विचार करत होते की,किल्लेदार एवढे कसे चांगले आहेत? आणि का?
अस वाटत होतं की आज सगळ तसेच राहु दे,काही कराय नको.कुठे जायला नको.बस त्यांच्या मांडीवरी डोक ठेवून शांत डोळे मिटून पडून राहाव.माझ्याकडे असलेली ठेव अशीच बंद डोळ्यांनी अनुभववी.
पण.......
10.30 पर्यंत दोघांनिही उरकल आणि आम्ही बाहेर पडलो.आज मुंबईत जायचं होतं. काम होतं म्हणून नाही तर असच फिरायला.
Sunday असल्यामुळे आज 11 ते 4 megha block. कशी बशी 10.45 ची last लोकल पकडली आणि आम्ही निघालो.
लोकल मध्ये ही पूर्ण वेळ मी त्यांच्याच विचार करत होते. अस कधी झालं नव्हतं. पण आज मला ध्यानिमनी, सभोवती तेच दिसत होते.आणि त्यांचं भलंमोठं मन. त्या मनात माझ्यासाठी असलेलं खुप सार प्रेम.
 12 ला आम्ही VT ला पोचलो. तिथुन मग कमला नेहरू उद्द्यान, सर फिरोज शहा उद्द्यान पाहून मग आम्ही गिरगांव चौपाटी ला आलो.मुंबईचा समुद्र किनारा म्हणजे काळ काळ पाणी आणि किनारयावर लाटांमुळे जमा झालेला कचरा.पण मला ते ही छान वाटत होतं.बराच वेळ आम्ही तिथे बसून सागराच्या लाटा पाहत होतो.दिवस कधी आणि कसा संपला समजलच नाही.


सूर्य ही समुद्राच्या लाटांमधे लपला .सगळीकडे  संध्याछाया पसरु लागली . मग आम्ही ही घरी जायला निघालो.
परत लोकल चा प्रवास.....
मी खुप थकले होते...कधी घरी पोचतेय अस झाल होतं.
आम्ही लोकल मध्ये चड़लो. VT पहिलाच stop आल्यामुळे गर्दी कमी होती.आम्हाला बसायला जागा मिळाली.पुढे गाड़ी थांबेल तशी गर्दी वाढत गेली.ती गर्दी पाहून थकवा जास्तच जाणवू  लागला.माझे डोळे पेंगाळत होते.मी किल्लेदारांच्या खांद्यावर डोक ठेऊन झोपले.लोकलच्या स्पीड मुळे माझी मान मागे पुढे होत होती.त्यांनी ते पाहिलं. माझं डोक हळूच त्यांनी त्यांच्या मांडिवर ठेवल.
तोच हा क्षण ......जो मनात घर करून गेला. त्या क्षणी मी उरली सुरली सगळी हरले होते .....
त्यांच्यापुढे......
तसं मी प्रवासात किती तरी वेळा त्यांच्या मांडिवर डोकं ठेऊन झोपलेय पण आजची गोष्ट वेगळी होती.लोकल मध्ये खुप गर्दी होती.बाया,लहान मुले सगळी अवघडून,दाटी वाटी ने प्रवास करत होती.मी एकटिच अशी आरामात झोपले होते.कारण माझ्याकडे किल्लेदार होते......माझे किल्लेदार!!
आज खुप बदलले होते मी. मलाच मी वेगळी वेगळी वाटत होते.त्यांच्यासमोर सार काही फिकं फिकं वाटत होतं. कारण मी माझ्या साऱ्या माणसांना , नात्यांना संभाळत आले,समजून घेत आले,सगळ्यांसाठी नेहमी माघार घेत आले.पण किल्लेदारांकडे नेहमी हट्ट करत राहिले.जरा काही मनाविरुद्ध झाल की लगेच चिडचिड करायची.पण ते कधिच काही बोलले नाहीत.पावलोपावली समजून घेत आलेत.
आज का कुणास ठाऊक पण मन तुलना करीत होतं. किल्लेदारांची आणि साऱ्या नात्यांची. एकीकडे माझा सारा गोतावळा ,माझी सारी माणस होती.सासरची,माहेरची दोन्हीकडील आणि एकीकडे होते फक्त किल्लेदार. पण पारड किल्लेदारांच जड़ वाटू लागल होतं. ते एवड़ जड़ होत की, मी त्या भाराने पूर्ण झुकले होते.
आमचं station आलं,गाड़ी थांबली.माझं विचारचक्र ही थोड़ा वेळ थांबल.
आम्ही लोकलमधुन उतरलो आणि auto ने घरी निघालो.घर जवळ येत होत. हवेत थोड़ी थंडी जाणवत होती.मी हळूच त्यांचा हात माझ्या हातात घेतला.त्या क्षणी मला माझाच हेवा वाटत होता.गर्व वाटत होता. अस वाटत होत, की कुणाला लाभली नाही अशी दैवी साथ मला लाभली आहे.परत माझं विचारचक्र सुरु झाल.इतक्यात माझी नजर आकाशात गेली.काळकुट्ट आभाळ,चांदन्या आणि चंद्राची कोर...... खूपच रमणीय होतं. मला ती चंद्रकोर पाहून क्षणभर अस वाटल की,ती कोर आमच्याकड़े पाहतेय,जणु ती आम्हाला शुभ रात्रि म्हनतेय..…..
मी ही हसुन तीला शुभ रात्रि म्हनलं..…..!!!

8 comments:

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...