Saturday 22 December 2018

माणूस

किती रूपं माणसाची
किती बोलतो हा भाषा
त्याच्या माणूसपणाची
केली त्याने दुर्दशा

असा कसा रे माणसा
तू बदलतो रंग
तुझी किमया पाहुनी
झाला दानवही दंग

नको बाळगू तू वेडया
खोटी अवास्तव हाव
तुला झेपेल अशाच
वाटेवरूनी तू धाव

असता तुझे तुझ्यापाशी
का तू असा वाऱ्यावरी ?
तुझे आयुष्य असे का
झाले उदास,लाचारी

किती करतोस चाळे
किती करशील भोंदुपणा
तुला जमतो कसा रे
जणामधे साधुपणा

जे नाही तुझ्या श्रमाचे
त्याची का तुला अभिलाषा
दुसऱ्याच्या धनावरची
दे सोडूनि तू आशा

एकेकाळचा राम तू
तूच आहेस शिवबा
शोध जरा अंतरी तू
तुझ्या कर्तुत्वाची शोभा

No comments:

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...