Thursday 29 November 2018

वडील......



आठवतात ते दिवस... .
जेव्हा,
सावली बनून तुम्ही सोबत होता....
डोक्यावर आभाळ नव्हतं,तुमचा हात होता.....
तुमचं सुख माझ्या सुखात असायच....
दुःख माझ तुमच्या डोळ्यातून वाहायच.….
बोट पकडून चालायला तर शिकवल.....
चालता आल्यावरही हात पकडूनच सगळीकडे नेल.....
मी जेवले ते माहित असायच.....
तरीही,आपण जेवायच्या आधी,तू जेवलीस ना म्हणून विचारायच.....
हसायची तर नेहमीच,का हसतेस म्हणून कधी नाही विचारायच....
गप्प जरा दिसले की लगेच,कोण काय बोलल तुला ? म्हणून आईकडे पहायच....
किती आठवणी त्या डोळ्यासमोर तरळतात
थेंब आसवांचे नकळत ओघळतात
काय होतात माझ्यासाठी ते सांगायचंच राहून गेल
शब्द येण्याआधी ओठांवर, विश्व माझ उधळुन गेल....
कळ उठते काळजात तो क्षण आठवला की
हुरहुर लावून गेल, ते तुमचं जाण अकाली
डोळे भरून पहा.... शेवटचे.... सांगत होती सारीजण
शेवटचे....?
शेवटचे....??
मनात घुमत होता हा एकच प्रश्न
ओल्याचिंब डोळ्यांनी पाहिला तो सोहळा
ती आंघोळ...ती आरती....कपाळावरील तो टिळा
पाहून हे सार.... कस सांगू....किती न कशी तुटले
आक्रोश किती-किती ऱ्हदयामधुन उठले
दूर तुमची चिता ....न माझ्यात मी
अकाचवेळी जळत होती
कितीतरी वेळ....
चिता शांत ही झाली
पण मी अजूनही जळतच आहे...
तुमच्या आठवणीत
रोज,थोड़ी थोड़ी....
तुम्ही गेलात...दूर
पण ऐका.....
मी रोज बोलावतेय तुम्हाला.....
आवाज देतेय, दाही दिशांना....
याव लागेल तुम्हाला....
किमान माझ्या स्वप्नात तरी.....
आणि येऊन..
परत एकदा थोड़ चालाय शिकवा.....
तुमच्याशिवाय कस जगायच तेहि शिकवा.....
दया आवाज परत एकवेळ....रानी रे......!!!

3 comments:

Unknown said...

Khupach Chan...👍

N.s. said...

वडील.... Really heart touching... डोळ्याच्या कडा अलगत ओल्या झाल्या....

Sampattikilledar said...

.......................

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...