Wednesday 27 February 2019

Miss you

गेल्या आठवड्यात जुन्या मैत्रिनिचा फोन आला होता.20 वर्षांनी आम्ही बोलत होतो.खुप छान वाटलं ....मे मधे गेटटुगेदर करायच आहे ते सांगाण्यासाठी फोन केला होता तिने.

इतक्या वर्षांनी तिच्याशी बोलत होते.जुन्या आठवणी निघाल्या.जुने दिवस डोळ्यासमोर तरळु लागले.ती भांडने... ती नाराजी....खोडया.... सारं काही.
तिने खुप आग्रह केला की यायचच....गेटटुगेदर ला म्हणून....
मी म्हणल....बघते त्यावेळी आणि सांगते.....गावी असेन तर येइन.
मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि फोन ठेऊन दिला.
परत 4 दिवसांनी तिचा फोन आला...... आणि लागली शिव्या घालायला......एक फोन पण नाही केलास ....काही आठवण नाही... फोन ठेवला ते लगेच विसरली... अस काही काही बोलू लागली.....परत गप्पा सुरु.......ती बोलत होती....खुप ...मी बस ऐकत होते....ती परत जुन्या आठवणीत रमून गेली.....
मधेच तिने मला विचारले....तू काहीच बोलत नाहीस....तुला नाही का  आठवण येत......miss करत नाहीस तू....जुने दिवस...
मला नाही माहित.....मी म्हणल.
ती गप्प झाली...कदाचित तिला माझ्या हो ची अपेक्षा होती.
पण माझं उत्तर हो न्हवतं.....काहीच न्हवतं.....म्हणजे मला माहित न्हवतं...
कारण आठवनिची व्याख्या माझी वेगळी होती.परिस्थितिने ती बदलली होती....
        आठवण......








काय अर्थ आहे......?
या गोड शब्दाचा...
खर तर ती मनापासून बोलत होती....पण माझंच मन जरा ठीक न्हवतं.....ते जरा जास्तच चौकस झालं आहे . सगळ काही खोटं खोटं वाटू लागलय.....शब्द सारे फ़सवे वाटतात.....आपलेपणा, प्रेम,नाती,मैत्री सगळ काही दिखावा वाटू लागला आहे....अशात मी तिच्या प्रश्नाच उत्तर काय देणार.....?
मी बस्स एवढंच म्हणल.....miss करणे म्हणजे आठवण येणे......
तशी आठवण येते.....कधी कधी
पण तिच समाधान नाही झालं......ती म्हणाली, मग अजुन कशी आठवण असते.....?
मी हा विषय टाळायचा खुप प्रयत्न केला....पण तिने मुद्दा नाही सोडला......
मी म्हणल....आठवण हा शब्द एकच असला तरी त्याचे अर्थ खुप वेगळे असतात......व्याख्या नात्याबरोबर बदलत जाते.....
ऱ्हदयाच्या तळापासून मी miss करते माझ्या आप्पांना.....जेव्हा कुणी मुलगी आपल्या बाबांकडे हट्ट करते तेव्हा.....
जेव्हा खुप खुश असते तेव्हा ती खुशी पाहून खुश होणारी त्यांची नजर miss करते. गावी येताना गाडी late झाली की सतत येणारा त्यांचा फोन.....त्या फोनची bell miss करते....आईकडे असताना....जेवताना, बाजूची रिकामी जागा पाहते तेव्हा त्यांचे ताट miss करते.....
आजारी असते तेव्हा आईला miss करते.कधी उदास असते तेव्हा भावाला miss करते....जेव्हा कधी काही दुःख मनाचे बांध ओलांडून डोळ्यात दाटून येऊ पाहतं तेव्हा किल्लेदारानां miss करते.....ते असतात सोबत.....बस्स
बाकी तर miss you फक्त म्हंणन्यापुरतं असतं.
म्हणायचे..... आणि विसरून जायचे.....
आठवण येते कधी कधी सगळ्यांची.....नाही अस नाही. पण ती miss you च्या पटडीतिल....
ती ऐकत होती.....तिला खुप आश्चर्य वाटत होतं, माझं बोलनं ऐकून....ती म्हणाली, एवडी मोठी कधी झालीस ग....तिचा आवाज घोघरा झाला होता....जणु हुंडका गळ्यात कैद करु पाहत होती.
मी म्हणल.....नंतर बोलुया .....आणि मी फोन ठेवून दिला.....
कारण पुढे बोलाय तिच्याकड़ेही शब्द न्हवते आणि माझ्याकडेही......!!!

No comments:

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...